भंडारा : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), मार्फत महाराष्ट्र शासनाच्या नागपूर फ्लाइंग क्लब मार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील २० विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उमेदवारांनी महाज्योतीच्या कार्यालयाला भेट देवून महाज्योतीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांचे स्वागत केले. यावेळी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणाची माहिती व्यवस्थापकीय संचालक यांनी करून घेतली. तसंच विद्यार्थ्यांनी त्यांना येणार्या विविध अडचणी व समस्या या व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या समोर मांडल्या.
विविध अडचणी व समस्यांच्या अनुषंगाने व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना आपले लक्ष पूर्ण करण्याकरिता प्रेरीत केले. प्रत्येक अडचणीमध्ये महाज्योती विद्यार्थ्यांच्या सोबत राहील असा व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्यार्थ्यांना विश्वास दिला. या अनुषंगाने आपण लवकरच नागपूर फ्लाईंग क्लबला भेट देण्याचे आश्वासन देखील महाज्यांतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी विद्याथ्यांना दिले.