पवनी येथील वैनगंगा नदी पुल बनून कित्येक दशक ओलांडून सुद्धा अजूनही उपेक्षित असल्याचे दिसून येते.कधी फुटलेल्या रस्त्यामुळे होणारे असंख्य अपघातांना हर्षल वाघमारे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत केलेल्या आंदोलनामुळे आळा बसला आणि पुलावरील रस्ता दुरुस्त करण्यात आला.परंतु या पुलावर पथदिवे नसल्याने दिवस बुडता पडणाऱ्या अंधारामुळे पायी व सायकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यांचा जीव मुठीत घेऊन ये जा करावा लागतो.पवनी तालुक्यातील अधिकतर गावांना पवनी शहरांसोबत जोडणारा पवनी वैनगंगा नदीवरील एकमात्र पूल असल्याने ग्रामीण जनतेला ये जा करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही. ग्रामीण भागातून सायकलनी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे थवेच थवे याच मार्गावर दिसून येतात.इतका रहदारीचा मार्ग असून अजूनही संबंधित विभागाने आजपर्यंत कुठलीच कारवाई न केल्याचं दिसून येते.यात प्रशासनाची उदासीनता पाहायला मिळते.ही जनतेची समस्या समजून घेत प्रहार जनशक्ती पक्ष पवनी शहर कडून संबंधित कार्यालयाला मागणीपर निवेदन देण्यात आले आणि त्वरित या पुलावर पथदिवे लावण्याचे काम सुरू करण्याचा आग्रह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी धरलेला आहे.असे न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष पवनी शहर कडून आंदोलनाचा इशारा संबंधित कार्यालयीन अधिकाऱ्यांना देण्यात आला.निवेदन देताना प्रहार पक्षाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष अंकुश वंजारी, जिल्हा उपाध्यक्ष दुधराम बावनकर, जिल्हा संघटक सागर टावरी, तालुका अध्यक्ष तलमले,रुपेश जुमडे,युगल हटवार, चेतन अवसरे, रोहित नागपुरे, सोनू दंडारे व पवनी शहराध्यक्ष हर्षल वाघमारे उपस्थित होते.